एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम


गरीबों के लिए रोटी ही अध्यात्म है। भूख से पीडि़त उन लाखों-करोड़ों लोगों पर किसी और चीज का प्रभाव पड़ नहीं सकता। कोई दूसरी बात उनके हृदयों को छू ही नहीं सकती। लेकिन उनके पास आप रोटी लेकर जाइये और वे आपको ही भगवान की तरह पूजेंगे। रोटी के सिवा उन्हें और कुछ सूझ ही नहीं सकता। - महात्मा गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या " गावाकडे चला " या संदेशातून प्रेरणा घेऊन "पीपल्स इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट(PIRD)"संस्था गेल्या ३० वर्षापासून शेतकरी, महिला आणि मुले यांच्यासाठी, पाणलोट विकास कार्यक्रम, रोजगार निर्मिती आणि प्राप्ती, महिला सक्षमीकरण, बालमजूरी निर्मूलन, बालीका विवाह प्रतिबंध इ. कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात कार्यरत आहे.

गेल्या वर्षापासून PIRD भारत सरकारच्या “ एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात “ गावस्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात “ प्रशिक्षण संस्था “ या स्वरुपात सहभागी असून सद्य स्थितीत संस्था लातूर जिल्ह्यातील ३६ गावातून या विषयाच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने “ मृदसंधारन आणि जलसंधारण चे महत्व आणि त्याचे व्यवस्थापन यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय भविष्यात कृषीवर आधारीत व्यवसाय उभे रहावेत, यात प्रामुख्याने महिला बचत गट व शेतकरी गटांची क्षमता बांधनी व्हावी, असे पण या प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून अपेक्षित धरलेले उद्दीष्ट आहे “. मागील चार वर्षाच्या कालावधित संस्थेमार्फत या प्रकारच्या घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ७००० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे.


People’s Institute of Rural Development ( PIRD ) is a non profit organisation and from last 30 years working on various social & development issues related to Women, Children and Farmers. Some of the major projects we have undertaken are Watershed development programme, women empowerment, Eradication of child labour, Prevention of girl child marriages. Our focus is on Latur District in Maharashtra.

PIRD org. working for “ Integrated Watershed Management programme” with the Yashada, pune.we are working as a Training organization for farmers and women self help groups from last 4 years. We have undertaken training in 36 villages in Latur district. The aim of this programme is to educate farmers about importance and techniques of Water conservation & soil conservation and also do the capacity building for Agri based businesses. In the last four years more than 7000 farmers and women participated in our training programme.

Saturday, January 3, 2015

नवीन वर्षाचे स्वागत !नवीन वर्षाच्या स्वागत प्रसंगी, आपण सर्वजन पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या संकटात जगत आहोत. या संकटकाळात शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणार्‍या गावा-गावातील माणसांना जगण्यासाठी तातडीची मदत आणि दिलासा मिळण्याची अत्यंतिक गरज आहे. आलेले संकट केवळ शेतकरी आणि शेतीवर जगणार्‍यासाठीच नाही, तर ते आपणां सर्वावरचे संकट आहे. अशा प्रसंगी केवळ नवीन वर्षाच्या शुभेछा देऊन आलेल्या संकटातून आपली सुटका हॊणार नाही ! परिस्थितीत बदल होण्यासाठी  प्रत्येकांनी आपापल्या परिने आपल्या मदतीचा हात गावातील लोकांपर्यंत पोहंचेल याची दक्षता घेतली तरच नवीन वर्षाच्या शुभेछा फलद्रुप होतील. या कामात प्रत्येक व्यक्ती कांही ना कांही मदत करु शकतो, फक्त ईच्छाशक्ती पाहिजे !

पैशाच्या किंवा मदतीच्या महापूरांने पाणी टंचाई आणि दुष्काळ दूर होणार नाही. शासनाने कितीही दिले तरी आपणा सर्वांची गरज पूर्ण होणार नाही, आणि निसर्गाकडून मिळालेले  सर्वांना सरणार नाही ! हे सत्य आता तरी लक्षात घेतले पाहिजे. पाणी मिळणे ! ही यच्चावत प्राणीमात्राची मुलभूत गरज आहे. पाणी सर्वांपर्यंत पोहंचणेसाठी, पावसाचे पडणारे पाणी, आधी ते शेतशिवारात आडवले पाहिजे आणि मूरवले पाहिजे. पाणी आडवणे आणि जिरवणे ही जबाबदारी कांही केवळ गावातील लोकांची आणि शेतकर्‍यांची नाही, ही जबाबदारी शासनाची, आणि समाजातील सर्व वर्गाची आहे, याची आम्ही वेळीच दखल घेतली नाही तर, सर्वचजण पाणी संकटात अडकल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चित !

म्हणून, आता नवीन वर्षाचा प्रारंभ गावावर केंद्रीत करुन करु या ! याकरिता प्रत्येकाला आपापल्या मातृभूमीला प्राधान्य देता येईल, आपल्या जवळच्या गावाला जाता येईल, किंवा आपापल्या आवडीप्रमाणे गावांची निवड करुन या कामी हातभार लावता येईल. मात्र एकच प्रमुख बाब लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, आपल्या मदतीचा प्रमुख हिस्सा हा पावसाचे पाणी आडविणे, जमीनीत व जमीनीच्या वर पाण्याचा जास्तीत जास्त साठा करणे, यासाठी खर्ची पडेल असे उद्दीष्ठ ठेवले पाहिजे. 

मी स्वत: या कामात व्यक्तिश: सक्रीयपणे सहभागी होत आहे. आपण पण नवीन वर्षाच्या कृतियुक्त शुभेछात सहभागी व्हाल, अशी अपेक्षा आहे.

प्रारंभ झालेले सण २०१५ हे वर्ष आपणां सर्वांना पाण्याच्या मुबलकतेचे आणि अन्नधान्य समृध्दीकडे वाटचाल करणारे ठरो ! अशी मन:पूर्वक शुभेछा देतोत.

मच्छींद्र गोजमे,

अध्यक्ष                               

,         आणि     कार्यकर्ता संच

ग्रामीण विकास लोक संस्था , अहमदपूर (लातूर)

No comments:

Post a Comment